आश्वासित प्रगती योजनेसाठी शिक्षक आमदार आसगावकर यांना आयटकचे निवेदन

बार्शी (कटूसत्य. वृत्त.): विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 च्या आश्वासित प्रगती योजनचे रद्द केलेले जीआर पुर्नर्जीवित करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावेत या मागणीचे निवेदन पुणे विभाग नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांना आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच संयुक्त कृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून आज दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी देण्यात आले व चर्चा करण्यात आली. निवेदन संघटनेचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.
निवेदनामध्ये सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हाव्यात. सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा त्यासोबतच दहा वीस तीस वर्षाच्या लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी, पाच दिवसांचा आठवडा लागू व्हावा या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. यावेळी शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मा. वित्तमंत्री मा.उच्च शिक्षण मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनावर कॉ. तानाजी ठोंबरे, ए.बी. कुलकर्णी, प्रविण मस्तुद, उमेश मदने, विलास कोठावळे, सुधिर सेवकर, गणेश करंजकर, आरती रावळे, हनुमंत कारमकर यांच्या सह्या आहेत.
0 Comments