तहसील, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कालावधीत तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर (नवीन शासकीय धान्य गोदाम) व त्यांच्या संरक्षक भिंतीपासून 100 मिटरच्या परिसरात तहसीलदार जीवन बनसोडे यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार कलम 144 अन्वये दि. 16 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहेत.
0 Comments