ऐतिहासिक परिवर्तनासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

ऐतिहासिक परिवर्तनासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा..

ऐतिहासिक परिवर्तनासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा..


राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक तथा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांचे अवाहन
प्रभाग क्रमांक १७ मध्ये ज्योती क्रांती परिषदेचा झंझावात सुरू

मोहोळ ( क.वृ.):- समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन होण्याकरिता आपण लढलं पाहिजे. परंतू आपण लढायला विसरलो आहे.म्हणूनच आपण आपल्या न्यायहक्का पासून वंचित आहोत.वाडया-वस्त्यावरील सामान्यातील सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचं नेतृत्व पुढे आले पाहिजे म्हणूनच आत्ता परिवर्तनाची सुरुवात ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने सुरुवात झाली आहे. त्याकरिता आपण संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्तेच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे अवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक तथा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले. मोहोळ शहरातील प्रभाग क्र. १७ गाढवे वस्तीच्या नवीन शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे राज्याचे मारूतीभाऊ रोकडे, कार्याध्यक्ष तथा मोहोळचे नगरसेवक अतूल क्षिरसागर,ज्योती क्रांतीचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर, युवक कार्याध्यक्ष सागर अष्टूळ, शहराध्यक्ष सोमनाथ माळी,युवक शहराध्यक्ष बिरूदेव वाघमोडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगिता ताई पवार, युवती अध्यक्ष ज्योती ताई ननवरे, वर्षा ताई दुपारगुडे,राजश्रीताई क्षिरसागर, शाखाध्यक्ष बाळासाहेब माळी,सुलतान पटेल,संदिप जाधव,जितेंद्र अष्टूळ, प्रकाश सोनवणे,धनजंय माने, साहेबराव वाघमारे,संदिप सोनवणे,सिद्धार्थ एकमल्ले,तन्वीर शेख,रवि थोरात,गणेश गावडे,अंकूश माने,एकमल्ले भाऊ  भगवान गाढवे, बाबूराव गाढवे, संभाजी गाढवे, चंद्रकांत गाढवे, दाजी नागनाथ गाढवे, शरद गाढवे, संजय गाढवे,संजय गाढवे,श्रीरंग माने,दतात्रय गाढवे,विजय खरात शाखा अधक्ष,संदीप गाढवे, भगवान गाढवे, बाबुराव गाढवे, संभाजी गाढवे, चंद्रकांत गाढवे, दाजी नागनाथ गाढवे, शरद गाढवे, संजय गाढवे, श्रीरंग माने, विजय खरात, अध्यक्ष बाळू वाघमोडे, दत्तात्रय गाढवे, संदीप गाढवे, ओंकर गाढवे, सोमा सलगर, सिदु सलगर,आनिल वाघमोडे, आकुंश माने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगर परिषद येत्या काही महिन्यांवर आली असताना प्रभाग क्रमांक १७ मध्ये रमेश बारसकर यांच्या ज्योती क्रांती परिषदेच्या झालेल्या दमदार एन्ट्रीमुळे शहर परिसरात ज्योती क्रांती परिषदेच्या या शाखेच्या उदघाटनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची झंझावती नेतृत्वाची आक्रमक वक्तृत्वाची तोफ प्रभाग क्रमांक १७ मध्ये धडाडल्याने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी रमेश बारसकर यांनी मोहोळ शहराच्या विकासात्मक वाटचालीचे सर्व मुद्दे अत्यंत मुद्देसूदपणे  सर्वांसमोर मांडले. पदावर असो अथवा नसो मात्र ज्योती क्रांती परिषदेचा एक सक्षम शिलेदार या नात्याने तुम्हा सर्व बंधू भगिनींच्या मागे मी खंबीरपणे उभा राहणार आहे. तुमच्या भागातील रस्ते पाणी आरोग्य वीज आणि स्वच्छता सोडवल्या खेरीज मी स्वस्थ बसणार नाही अशी भीष्मगर्जनाही यावेळी रमेश बारसकर यांनी करताच उपस्थीतांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. 

प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते ज्योती क्रांती परिषदेच्या शाखाध्वजाचे उदघाटन करून या शाखेची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे निमंत्रक श्रीकांत गाढवे यांनी उपस्थिताचे आभार व्यक्त केले.

आमच्या गाढवे वस्ती रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षा पासून प्रलंबित होता.कित्येक नेत्याने फक्त आश्वासन दिली परंतू आमचे नेते रमेश बारसकर यांनी शब्द दिला होता कि माझ्या उमेदवाराला निवडून द्या लगेच मी रस्ता करतो.निवडणूकीत माझा पराभव झाला परंतू त्यांनी दिला शब्द खरा केला. खरंतर हाच माझा विजय आहे असे भावनिक उदगार आभार व्यक्त करताना श्रीकांत गाढवे यांनी काढले.ज्योती क्रांती परिषदेच्या या नवीन शाखा उदघाटनामुळे ज्योती क्रांती परिषदेच्या कार्यकर्ते बंधू आणि भगीनी मध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढील काळातही आम्ही सर्व रमेश बारस्कर यांना मानणारे प्रभाग क्रमांक १७ मधील कार्यकर्ते ज्योती क्रांती परिषदेच्या मागे खंबीरपणे उभे आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages