Hot Posts

6/recent/ticker-posts

१३ नंबर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या पाठपुराव्यासाठीच राजकीय क्षेत्रात पदार्पणाचा विचार..

१३ नंबर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या पाठपुराव्यासाठीच राजकीय क्षेत्रात पदार्पणाचा विचार.. 

७१ फाऊंडेशनचे संस्थापक जिब्राईलभाई शेख यांचा मनोदय

मोहोळ (क.वृ.): गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. अनेक समविचारी आणि सर्व स्तरातील मित्र बांधवांनी सतत उमेदीचे आणि सहकार्याच्या ऊर्जेचे बळ दिल्यामुळेच मोहोळ शहरात विविध उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांची मी सेवा करत आलो आहे. राजकीय हेतू मनात ठेवून कधीही सामाजिक कार्यात वाटचाल सुरू ठेवली नाही.मी सध्या वास्तव्यास असलेल्या प्रभाग क्रमांक तेरा मधील रस्ते पाणी आरोग्य वीज त्याचबरोबर स्वच्छता विषयक सोयी सुविधांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे आहे.त्यासाठी राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून या प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत जाणे आवश्यक ठरते. त्यामुळेच येत्या काळात होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे अशी घोषणा प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार आणि इच्छुक उमेदवार जिब्राईलभाई शेख यांनी माध्यमांशी बोलताना केली.

येत्या काही महिन्यात होणाऱ्या मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत उमेदवारीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना युवानेते जिब्राईलभाई शेख बोलत होते.

येत्या काळात प्रभागातील माझ्या संपर्कातील मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या समविचारी बांधवांची बैठक बोलावणार आहोत. सर्वांनी जर मला या निर्णयाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चितपणे आपण येणाऱ्या काळात होणारी नगरपरिषद निवडणूक लढवणार असल्याची स्पष्टोक्तीही यावेळी प्रभाग क्रमांक तेरा मधील नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार जिब्राईलभाई शेख यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील सहकारी मित्र परिवार आणि प्रभाग क्रमांक १३ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवून ७१ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकारी बांधव सक्रिय आहोत. दिव्यांगांना मदत करण्याबरोबर त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून वचनबद्ध आहोत. वृक्षारोपण असो अथवा रक्तदान शालेय साहित्याचे वाटप, क्रीडापटूंना प्रोत्साहन वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन सुरूवातीपासून करत आलो आहे. दर ७ फेब्रुवारी रोजी असलेल्या माझ्या वाढदिनी कोणतेही पोस्टरबाजी अथवा अनावश्यक खर्च न करता गरजूंना जेवण शाळकरी मुलांना खाऊ वाटप करण्याची आमची परंपरा आहे. पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात ही सर्वसामान्यांना अत्याआवश्यक वस्तू पुरवण्याचा उपक्रमांने दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. केवळ विविध समस्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पणाचा माझा विचार आहे. - जिब्राईलभाई शेख (संस्थापक अध्यक्ष ७१ फाउंडेशन मोहोळ)

Reactions

Post a Comment

0 Comments