Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या प्रभाग क्रमांक १२ चा पुढील नगरसेवक कोणता पक्ष ठरवणार नाही तर प्रभागातील जनताच ठरवेल सामाजिक कार्यकर्ते डॉ. संग्राम गायकवाड यांचा विश्वास

मोहोळच्या प्रभाग क्रमांक १२ चा पुढील नगरसेवक कोणता पक्ष ठरवणार नाही तर प्रभागातील जनताच ठरवेल सामाजिक कार्यकर्ते डॉ. संग्राम गायकवाड यांचा विश्वास

मोहोळ (क.वृ.):- मोहोळ शहराच्या पश्चिम भागातील महत्त्वाचा समजला जाणारा आमचा प्रभाग आहे. आमच्या प्रभाग गेल्या काही वर्षापासून नगरपरिषदेचे सर्व कर अगदी प्रामाणिकपणे भरत आहे. सर्वात कमी थकबाकी प्रभाग क्रमांक १२ ची आहे. त्या करापोटी नगरपरिषदेने आम्हाला ज्या प्रमाणात  सोयी-सुविधा द्यायला हव्या होत्या त्या त्या प्रमाणात मिळू शकल्या नाहीत हे आमच्या प्रभागातील तमाम नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल. रस्त्यांची कामे झाली मात्र इतर समस्या तशाच कायम आहेत. गत निवडणुकीमध्ये आम्ही प्रभागातील मतदारांनी एकमुखाने धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यमान युवा आणि सुशिक्षित नगरसेवकांना निवडून दिलं. त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने कामही केलं. आता आरक्षण सोडतीनंतर या प्रभागातुन जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आमच्या प्रभागाच्या सर्व सोयीसुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून एक सर्वांगीण विकसित प्रभाग करण्याची आम्हाला खात्री द्यावी. मगच आम्ही  उमेदवाराला निवडून देऊ अशी ठाम भूमिका या प्रभागातील दक्ष नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संग्राम गायकवाड यांनी  माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

येत्या काही महिन्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीबाबत प्रभागातील भूमिका स्पष्ट करताना डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की मी स्वतःला कधीही किंगमेकर समजत नाही. मात्र आमच्या प्रभागातील सर्व सुशिक्षित आणि सावध सुजाण जनता किंगमेकर आहे हे कुणीही विसरू नये. त्यामुळे या प्रभागावर कोणीही आपल्या मक्तेदारीचा हक्क लादण्याचा प्रयत्न करत विकासाचे धोरण मनामध्ये न ठेवता दावा सांगू नये. शिवाय हा प्रभाग कोणीही अतिआत्मविश्वास बाळगत जमेत धरू नये. यापूर्वीही त्यावेळी  ज्येष्ठ पक्षश्रेष्ठींच्या शब्दाचा मान राखत विकासाच्या मुद्द्यावर प्रभागा बाहेरचे असूनही निवडून दिले. यापुढील काळातही विकासाच्या मुद्द्यावरच योग्य उमेदवार निवडून देऊ असेही ठाम मत डॉ.संग्राम गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments