Hot Posts

6/recent/ticker-posts

चिकुन गुनियाने लक्ष्मीनगर येथील ग्रामस्थ झाले हैराण,आरोग्य विभागासह प्रशासन ही कोमात

 चिकुन गुनियाने लक्ष्मीनगर येथील ग्रामस्थ झाले हैराण,आरोग्य विभागासह प्रशासन ही कोमात


कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण गावाचे  आरोग्य धोक्यात,गावचे पुढारी झाले भूमिगत



सांगोला (जगन्नाथ साठे):- लक्ष्मीनगर ता--सांगोला येथील नागरिक गेल्या एक महिन्यांपासून चिकुन गुनिया या विषाणूजन्य आजाराने हैराण झाले आहेत. जवळपास शंभरहुन अधिक लोक सध्या खाजगी दवाखान्यात डॉकटरच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहेत. तर अनेक जण या आजाराच्या भीतीने धास्तावलेले दिसून येत आहेत.मात्र उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी मात्र मुजोर आणि कामचुकार झाल्याची तक्रार अनेक सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवली आहे.



        कोरोना सारख्या भयानक रोगाने पुन्हा एकदा डोके वर वाढले असताना चिकुन गुनियाने स्थानिक आरोग्य विभाग मात्र सलाईन वर असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्र महुद बु व उपकेंद्र आचकदाणी च्या अंतर्गत लक्ष्मीनगर या गावचा समावेश होतो.मात्र या उपकेंद्रातील कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मात्र औषध उपचारा अभावी जीवन जगावे लागत आहे.  ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख असलेले ग्रामसेवक आणि प्रशासक म्हणून नेमलेल्या केंद्रप्रमुखानी मात्र अख्या गावाला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. तर ग्रामपंचायत निवडणूकीपुरते गावात दिसणारे गावपुढारी मात्र भूमिगत झाल्याची चर्चा संपूर्ण गावभर पसरली आहे.येणाऱ्या निवडणुकीत या गावपुढाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू,असा निर्धारच सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे. नावापुरते  या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामपंचायतीने एकदाच प्रतिबंधात्मक फवारणी केली आहे. अजून तरी प्रशासकांनी गावाला भेट दिली नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे.गावपुढारी मात्र आपल्याच तोऱ्यात असल्याचे गावकऱ्यातून बोलले जात आहे.
      
    चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.
       तरी येणाऱ्या काळात तरी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेवून या रोगाला हद्दपार करावे,असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे, तर कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना काय सूचना करणार हे पहावे लागणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments