माजी आम.डॉ गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर चरित्र ग्रंथ प्रकाशित
सांगोला दि.१३(क.वृ.): शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांचा ९३ वा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. या वेळी माणदेशातील जेष्ठ लेखक डॉ. कृष्णा इंगोले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चरित्र ग्रंथ रूपाने लिहून प्रकाशित करून त्यांना अनोखी सप्रेम भेट दिली आहे.
याप्रसंगी मा .प्रा. शिवाजीराव काळुंगे सूतगिरणीचे चेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे ग्रंथाचे प्रकाशक व कवी इंद्रजित घुले उपस्थित होते.
आजच्या काळातील तत्वनिष्ठ चरित्र संपन्न आदर्श नेतृत्व म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख होय, आमदार म्हणून ५१ वर्ष विधानसभेत सदस्य म्हणून काम करून देशात विक्रम प्रस्थापित केला आहे. शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी उभे आयुष्य संघर्ष करणारे ते आदर्श नेते ठरले आहेत .
त्यावर डॉक्टर कृष्णा इंगोले सर यांनी राजकारणातील " आदर्श व्यक्तिमत्व भाई गणपतराव देशमुख " हि पुस्तका लिहिली आहे. मंगळवेढ्याचे कवी आणि प्रकाशक इंद्रजित घुले यांच्या शब्द शिवार प्रकाशनाच्या वतीने ती प्रकाशित करण्यात आली. या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ ९ ऑगस्ट २०२० रोजी शेतकरी सहकारी सूतगिरणी वर प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते व माननीय चंद्रकांत दादा देशमुख, चेअरमन नानासाहेब लिगाडे , श्री पी डी जाधव , सभापती राणीताई कोळवले , यांच्या उपस्थितीत पार पडला. प्राध्यापक नानासाहेब देशमुख यांनी स्वागत केले इंद्रजीत घुले यांनी प्रस्तावना केली लेखक कृष्ण इंगोले यांनी ग्रंथ निर्मिती ग्रंथांचा असे भाई गणपतराव यांच्या राजकीय सामाजिक कार्याची वैशिष्ट्ये आणि त्यांचे माणूस म्हणून मोठेपण विशद केले माननीय चंद्रकांत दादा देशमुख यांनी आपले शेंडगे घराने शिवाजी महाराजांची संबंधित आहे, शिखर शिंगणापूरला आमच्या पूर्वजांनी शेंडगे दरवाजा बांधला आहे नाझ-याला आमच्या पूर्वजांनी न्यायदान व्यवस्था चालवले आहे आबासाहेबांना प्रसिद्धी आवडत नसल्याने त्यांच्यावर लेखनाला ते संमती देत नाहीत.
पण चरित्रलेखन होण्याची गरज आहे प्राध्यापक शिवाजी काळुंके म्हणाले पाणी परिषदेच्या चळवळीच्या निमित्ताने मी आमदार साहेबांबरोबर ३० वर्ष काम केले आहे.त्यांचे व्यक्तिमत्व अनेक गुणांनी परिपूर्ण असून अभ्यासूपणा हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे डॉ.इंगोले सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आबासाहेबांना आग्रह धरून आत्मचरित्र व चरित्र लेखन करण्यास प्रवृत केले पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रा. संभाजी शिंदे यांनी आभार मानले.
कोरोना काळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला याप्रसंगी शेकापचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, माननीय बाळासाहेब एरंडे , खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष पि.डी.जाधव, नगरसेवक सुरेशजी माळी , दि.धों.जगताप, अँडवोकेट देशमुख, माजी सभापती संतोष देवकते, दूध संघाचे मारुती ढाळे, किशोर बनसोडे , शिवाजीराव बंडगर, ज्योतिराम फडतरे, रफिक तांबोळी,संतोष देवकते, हनुमंत कोळवले, बाळासाहेब बनसोडे ,ज्ञानेश्वर डोंगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
हा समारंभ संपल्यानंतर मा. देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांचा फेटा ,शांल, गुच्छ, श्रीफल, पेढे देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व भाई गणपतराव देशमुख या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.
0 Comments