रॅपिड टेस्ट ऐवजी घशातील स्वँब द्वारे चाचणी करा : शेखर खिलारे
अकलूज दि.१३(क.वृ.): कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात सध्या रॅपिड टेस्टच्या माध्यमातून जनतेच्या कोव्हीड 19 च्या टेस्ट चालू आहेत.त्या रॅपिड टेस्ट न करता प्रशासनाने घशातील स्वँबद्वारे चाचणी कराव्यात असे मत शेखर खिलारे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत.वातावरणात बदल होत असल्याने या दिवसांमध्ये प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीला व्हायरल इनफैक्शन सर्दी,ताप,खोकला,अंगदुखी,हा आजार असतोच हे आजार म्हणजे दरवर्षीच्या पावसाळ्यातील आजार आहेत.एखाद्या व्यक्तीमध्ये ह्यापैकी एक जरी आजार असला तर रॅपिड टेस्टमध्ये कोव्हीड-19 हा आजार पॉझिटिव्ह दाखवत आहे.व त्यामुळे पेशंटची संख्या वाढत चालली आहे. संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह दाखवतय परंतु लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. रॅपिड टेस्ट मध्ये पॉझिटिव आला की त्याला कोरोना सेंटरला नेऊन दहा दिवस ठेवलं जातं तिथं नॉर्मल गोळ्या शिवाय त्या पेशंटवर कोणत्याही प्रकारचा उपचार केला जात नाही.उलट त्या सेंटर मध्ये जर पहिला एखादा रुग्ण खरोखरच कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याची लागण इतर सर्वांना होण्याचा धोका नाकारता येत नाही.म्हणून रॅपिड टेस्ट बंद करून घशातील स्वँबद्वारे परफेक्ट टेस्ट चालू कराव्यात.आणि रॅपिड टेस्ट चालू ठेवायच्याच असतील तर त्या चाचणीद्वारे पेशंट पॉझिटिव्ह आला आणि त्याला काहीच त्रास होत नसेल तर घरीच "होम क्वारंटटाईन" करावे असा निर्णय घ्यावा.अन्यथा प्रशासनाच्या विरोधात जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कोव्हीड चाचणीच्या पाश्वभूमीवर बोलताना अकलुज शहर युवासेना प्रमुख शेखर राजाभाऊ खिलारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी द्वारे बोलताना माहिती दिली. सदरचे निवेदन युवाससैनिक अजिंक्य पासगे यांच्या मार्फत अकलुज प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे.
0 Comments