अध्ययन निष्पतीवर आधारीत अध्यापन करावे- दिगंबर काळे
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी ‘अध्ययन निष्पत्ती’ (Learning Outcomes) या संकल्पनेवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले. या शिक्षण परिषदेत उपळाई बु केंद्रातील सर्व प्राथमिक ,माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षकांचे काम नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याने कोणते कौशल्य आत्मसात केले, हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी अध्ययन निष्पत्ती हे योग्य मार्गदर्शक तत्व आहे.निपुण भारत अभियान, मूल्यमापन धोरण, तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.असे तज्ञ मार्गदर्शक पा.व,शिंदे यांनी म्हटले आहे.कचरेवस्ती शाळेच्या शिक्षिका मनिषा लोंढे यांनी अध्ययन निष्पतीवर सखोल असे मार्गदर्शन केले.शिक्षक विठोबा गाडेकर यांनी नवीन शिक्षण तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन, नैतिक शिक्षण, आणि डिजिटल शिक्षण यावर सखोल चर्चा घडवून आणली. कार्यक्रमाचे उद्घाटन म.ल.कन्या शाळेचे शिक्षक गणपत दाढे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपळाई बु केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूञसंचलन शहाजी क्षीरसागर यांनी तर आभार नानासाहेब ढेरे यांनी मानले.
0 Comments