Hot Posts

6/recent/ticker-posts

महसूल सप्ताह निमित्त माळशिरस तालुक्यात विविध उपक्रम

 महसूल सप्ताह निमित्त माळशिरस तालुक्यात विविध उपक्रम





अकलूज (कटूसत्य वृत्त):- महसुल विभागामार्फत राज्यात दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी महसुल दिन व दि. १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कलावधीत महसुल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येणार असुन त्यांअतर्गत उपविभागीय अधिकारी, अकलुज विभाग माळशिरस व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेमार्फत दरम्यानचे कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.
महसूल सप्ताहमध्ये खालील नमुद केलेले विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी तहसिल कार्यालय माळशिरस सभागृह, सकाळी १०.३० वा. महसुल सप्ताह शुभारंभ कार्यकम व विविध शासकिय योजना व सेवा याचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ व प्रमाणपत्राचे वाटप करणे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव कार्यक्रम होणार आहे.

दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी तहसिल कार्यालय माळशिरस सभागृह, सकाळी १०.३० वा. मा. जिल्हाधिकारी सो. सोलापूर, यांनी प्राधिकृत केल्यानुसार उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलुज या कार्यालयामार्फत प्रधानमंत्री आवास योजना सर्वासाठी घरे या योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील एकूण ४७ भुमीहीन लाभार्थ्यांना शासकिय गायरान जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याबाबतच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

दि. ०३ ऑगस्ट २०२५ रोजी तालुक्यातील ठिकाणी विविध पाणंद व शिवरस्त्यावरील अतिक्रमण निष्कासीत करणेसाठीची कार्यवाही सुरु करणे. तसेच अतिक्रमण मूक्त केलेले पाणंद व शिवरस्ते तसेच १०० दिवसांचे कार्यक्रमांतर्गत तयार करणेत आलेले मोक्षमार्गाचे दुतर्फा वृक्षारोपण करणे.

दि. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी माळशिरस तालुक्यातील एकुण १२ मंडळातील १२ गावामध्ये सर्व विभागांचे संयुक्त सहभागातुन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवुन विविध शासकिय योजनांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहेत. त्यामध्ये १२ महसुल मंडळातील पिलीव, गुरसाळे, गोरडवाडी, लवंग, खुडूस, माळशिरस, माळखांबी, मेडद, यशवंतनगर, मळोली, नातेपुते, पुरंदावडे या १२ गावांचा समावेश आहे.

दि. ०५ ऑगस्ट २०२५ रोजी १२ महसुल मंडळातील गावांमध्ये विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना) डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची विशेष मोहिम स्वरुपात आधार सिडींग करणे, डीबीटी पोर्टलवर डीबीटीबाबत असलेल्या सर्व समस्यांचे मंडळ स्तरावर निराकरण करणे.
दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित गावामध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे,तसेच शर्त भंग जमिनीबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकुल करणे/सरकार जमा करणे)बाबत निर्णय घेणे.
दि.७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय सभागृह येथे सकाळी १० वाजता M sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे (SOP प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे व महसूल सप्ताह सांगता कारणे,वरील सर्व कार्यक्रमात तालुक्यातील लोक प्रतिनिधी, नागरीक यांनी सहभागी होऊन,शासकीय योजनांचा व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments