अकलूजमध्ये आपदा मित्र/सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 4, 2025

अकलूजमध्ये आपदा मित्र/सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण

 अकलूजमध्ये आपदा मित्र/सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण

 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत रायगड येथे आपदा मित्र/सखी प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या स्वयंसेवकांसोबत अकलूज नगरपरिषद कर्मचारी यांचा संयुक्त शोध व बचाव कार्याचा सराव अभ्यास शनिवार, दि. २ ऑगस्ट व रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. हे प्रशिक्षण अकलूज नगरपालिका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या सहकार्याने, तर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या निर्देशानुसार घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी दिली.
सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आयोजित या उपक्रमात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सोलापूर रेस्क्यू स्क्वाडचे प्रशिक्षित स्वयसेवक  अनिल सल्ले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये जलप्रलय, इमारत कोसळणे, आग लागणे अशा विविध आपत्ती परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याच्या तंत्रांचा सराव करण्यात आला.
आपदा मित्र/सखी आणि नगरपरिषद कर्मचारी यांना प्राथमिक उपचार, शोध व बचाव उपकरणांचा वापर, सुरक्षिततेची काळजी, तसेच समन्वयात्मक कार्यपद्धती याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे अकलूज शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षणामुळे आपदा मित्र/सखींचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages