Hot Posts

6/recent/ticker-posts

सनराइज गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ उत्साहात

 सनराइज गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ उत्साहात


टेंभुर्णी, (कटूसत्य वृत्त):- येथील सनराइज गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांना 'हेड बॉय' (Head boy), 'हेड गर्ल' (Head girl), 'हाऊस मास्टर' (House master) आणि 'हाऊस लीडर' (House leader) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे, संस्थेच्या सचिव सुरजाताई बोबडे, अकॅडेमिक डायरेक्टर शाहिदा पठाण मॅडम आणि प्रशालेचे प्रिन्सिपल प्रभाकर सर उपस्थित होते. याचबरोबर पालक शिक्षक समितीचे सदस्य प्रिया शहा मॅडम तसेच गोवर्धन नेवसे सर हेही आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर, हेड बॉय आणि हेड गर्ल यांच्यासह सर्व हाऊस लीडर्सची निवड जाहीर करण्यात आली. संस्थेच्या सचिव सुरजाताई बोबडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली आणि पदाचे महत्त्व समजावून सांगितले.

अकॅडमिक डायरेक्टर शाहिदा पठाण मॅडम यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांचा शपथविधी पार पाडत विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली.

प्रिन्सिपल प्रभाकर सरांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कर्तव्याची शपथ (Oath) घेतली, ज्यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली. 

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन प्रशालेचे क्रीडा शिक्षक राहुल काळे सर, अनिकेत सर आणि कलाशिक्षक सतीश साळुंखे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली अनंतवार मिस यांनी केले, तर शक्ती सोनवणे सरांनी उपस्थितांचे आभार मानले. 
हा संपूर्ण कार्यक्रम अत्यं�
Reactions

Post a Comment

0 Comments