Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र वडार समाजाचा वतीने रॅली काढून निवेदन*

 विविध मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र वडार समाजाचा वतीने रॅली काढून निवेदन*


*टेंभूर्णी येथील वडार संघटनेचे नेते राजकुमार धोत्रे यांचा नेत्रात्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता*

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- अखिल महाराष्ट्राचा वडार समाजाचा वतीने पोलीस ठाण्याचा समोर रॅली काढून आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्यास अभिवादन करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर मोर्चेकारी बसून मागण्यांचे निवेदन दिले. वडार समाजाचा एसटी प्रवरगमध्ये समाविष्ट करावा, वडार समाजाला अट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण मिळावे,आर्थिक विकास महामंडळं स्थापन करावे, मुलांसाठी जिल्हास्तरावर शासकीय वस्तीग्रह निर्माण करावे, महिलंसाठी व मुलींसाठी सब्लिकरणाचा धोरणांचा लाभ मिळावा,जातींचे दाखले व नॉन क्रिमिल्यार दाखले कॅम्प घेऊन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी वडार समाजाचे नेते राजकुमार बाबा धोत्रे यांचा नेत्रात्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल पवार, गणेश देवकर, सागर पवार, रमेश पवार, घोडगे मामा, रामभाऊ वाघमारे, महेंद्र सोनावणे, श्रीकांत मासुळे, प्रकाश ननवरे, समाधान पवार, भरत दळवी, तानाजी पवार, रामभाऊ बनपट्टे, विकास बंदपट्टे, गणेश धोत्रे, महावीर वाजाळे, सुनील ओव्हाळ, कालिदास पवार, सनी पवार, बाळू जाधव, अनिल आरडे, शंभू पवार, शिवाजी पवार, मानेगाव पिंटू चौगुले, माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील वडार समाजातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांनी स्वीकारले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments