शिंदे गटाच्या बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शिवसेनेचे संपर्क नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत दोन गट एकमेकांना भिडलेले दिसले........
शिंदेंच्या शिवसेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यात निर्माण करणारे शिवाजी सावंत यांना निर्णय प्रक्रियेतून डावलायला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सावंत यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केल्यावर आज पक्षाचे निरीक्षक आमदार संजय कदम यांनी बैठक बोलावली होती........
पंढरपुरात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक आमदार संजय कदम यांच्या समोर दोन गट एकमेकांना भिडले...........
या बैठकीत बहुतांश सावंत समर्थक गैरहजर असले तरी जे हजर होते त्यांनी पक्षातील एका गटाकडून पक्षाची दिशाभूल केली जात असून यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी समोर आणल्यावर दोन गट एकमेकांना भिडलेले दिसले.......
सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे असे दोन गट असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची गटबाजी पक्षाच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे.........
0 Comments