संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरिता दिशा ठरविण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बुधवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सात रस्ता येतील शासकीय विश्रामगृह येथे दाखल होणार आहेत.
जरांगे पाटील यांच्या आगमनानंतर डाक बंगला येथे दिवसभर सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील सर्व मराठा बांधवांची ते भेट घेणार आहेत .तरी सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे असे अहवान सकल मराठा समाज शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
आंदोलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठा बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील हे दिवसभर चर्चा करण्याकरिता सोलापूरमध्ये उपलब्ध असणार आहेत. समाज बांधवाकडून करण्यात येणाऱ्या सूचनाबाबत ते चर्चा करतील आणि नंतर सर्वांच्या विचारविनयोगानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे.
0 Comments