Hot Posts

6/recent/ticker-posts

सार्वजनिक ग्रंथालयांनी अद्ययावत रहावे : हुसे

 सार्वजनिक ग्रंथालयांनी अद्ययावत रहावे : हुसे


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. ग्रंथालयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सतत अद्ययावत राहिले पाहिजे. त्यातून अधिक चांगल्या सेवा, सुविधा देत वाचकांभिमुख होता येईल, असे प्रतिपादन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले.

सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील 'स्वेरी' अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि सांगोला या चार तालुक्यांमधील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. इमारत बांधकाम, महिला व बाल विभाग तसेच ग्रंथालय विकासाच्या इतर बाबींची माहिती देऊन त्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती हुसे यांनी दिली. यावेळी जिल्हा ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांनी 'आरआरएलएफ' नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची प्रोजेक्टरद्वारे प्रत्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली. तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील यांनी 'ग्रंथ संजीवनी' व 'एनजीओ दर्पण' या योजनांची माहिती देत उपयुक्तता विषद केली.

या कार्यशाळेसाठी जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक कुंडलिक मोरे, अध्यक्ष विजयकुमार पवार, सचिव साहेबराव शिंदे, सहसचिव अन्सर शेख, ज्योतीराम गायकवाड, कल्याणराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 'स्वेरी'चे डिन प्रा.डॉ. करण पाटील यांनी ग्रंथालय चळवळीचे समाजासाठीचे योगदान खूप मोलाचे असल्याचे नमुद केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संचालक मच्छिद्र लेंडवे, प्रवीण पाठक, मिलींद उत्पात, प्रशांत जाधव, हनुमंत शिंदे, प्रमोद गायकवाड, तानाजी जाधव, दिलीप भोसले, संजय सरगर, माऊली कुलकर्णी, विनायक गुरव, संजय चव्हाण आदीनी परिश्रम घेतले. यावेळी पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या चारही तालुक्यांमधील ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहसचिव अन्सार शेख यांनी केले. सूत्रसंचालन रामदास नागटिळक यांनी केले, तर आभार सुनील नागणे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments