वाशिंबेतील केळी पुरवठादाराची ४० लाख ६७ हजाराची फसवणूक
करमाळा (कटूसत्य वृत्त):- विश्वास संपादन करून लाखो रुपयांची वेळी खरेदी केली मात्र पुन्हा पैसेच न देता विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये वाशिंबे येथील केळी सफलाब- सची ४० लाख ६७ हजार २०२ रुपयाची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणात धनराज ज्ञानदेव भोईटे (वय ४४, रा. वाशिंत्रे) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णीतील केळी एक्स्पोर्ट कंपनीचे मालक अजिंक्य मधुकर देशमुख यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.फिर्यादीनुसार वाशिंबेतील भोईटे यांची केळी सप्लाय करणारी कंपनी आहे. कंपनीमार्फत ते आजूबाजूच्या शेतकयांची केळी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी देतात.२०२४ मध्ये त्यांनी गुन्हा दाखल झालेल्या संशयित देशमुख यांच्या कंपनीसोबत केळी सप्लाय करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. देशमुखला त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये मा२४ लाख ३ हजार १५१ रुपयाची केळी दिली होती.त्यांनी १५ ते २० दिवसांमध्ये पैसे देणे आवश्यक होते. परंतु केळी पुरवल्यानंतर बरेच दिवस पैसे न दिल्याने त्यांना वारंवार फोन करून केळी पुरवलेल्या पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी फक्त ५ लाख ८४ हजार ९९८ रुपये दिले आहेत. त्यां ज्याकडे १८ लाख १८ हजार १५३ रुपये येणे बाकी आहे.मतोन नबीलाल शेख यांनीही देशमुखकडे २४ लाख ७५ हजार ११७ रुपयेची केळी दिली.त्यापैकी त्याने २ लाख ६९ हजार रुपये दिले. उर्वरित २२ लाख ४९ हजार देण्यास नकार दिला आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे.त्यावरून संबंधित कंपनीच्या मालकाने विश्वास संपादन करून केळी घेऊन पैसे न देता फसवणूक केली असल्याची फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.
0 Comments