Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 अकलूज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


अकलूज (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना,माळशिरस तालुका लहुजी शक्ती सेना,लहुजी साम्राज्य अकलुज यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मुलींच्या नावे बँक ठेव पत्र,शालेय विद्यार्थ्यांंना वह्या,नगरपरिषद महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी तर तालुक्यातील समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे वाटप अशा समाजपयोगी विधायक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
सदर उपक्रमांचे आयोजन जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी १०० मुलींच्या नावाने प्रत्येकी ५ हजार रु.बँक ठेवपत्र,विद्यार्थ्यांंना ५ हजार वह्या,नगरपरिषदेच्या सफाई महिला कर्मचारी यांना साडी,तालुक्यातील समाज बांधवांना जयंती साजरी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या २१ पुतळ्यांचे वितरण ह्रदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रंसंगी माजी जि.प.सदस्य शरद मोरे, जनसेवेचे आण्णासाहेब इनामदार,आण्णासाहेब शिंदे,
सतिश पालकर,रणजितसिंह देशमुख,नवनाथ साठे, सुधीर रास्ते,मयुर माने,बबनराव शेंडगे,विठ्ठल इंगळे, ज्योतीताई कुंभार आदी उपस्थित होते.यावेळी लहान वयात शिल्प साकारणारे सूरज युवराज जगताप यांना युवा शिल्परत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments