माढेश्वरी अर्बन बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
माढा (कटूसत्य वृत्त):- माढेश्वरी अर्बन बँकेला मागील आर्थिक वर्षात 2 कोटी 94 लाखांचा नफा झाला असून सभासदांना 9 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे.बँकेकडून सभासद व ग्राहकांना आरटीजीएस, निफ्ट, सीएमएस,इसीएस,क्यू आर कोड,एसएमएस आदी सेवा व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.येत्या सहा महिन्यात सभासदांना मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून देणार आहे तसेच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी केले आहे.
ते माढा येथे माढेश्वरी अर्बन बँकेच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी 3 ऑगस्ट रोजी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
प्रास्ताविक बँकेचे संचालक प्रा. डॉ.गोरख देशमुख यांनी केले.
अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले.
यावेळी ग्रामदैवत माढेश्वरी देवी व माजी आमदार (कै.) विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शहीद जवान,संशोधक,थोर नेते, लेखक व साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ,बँकेचे सभासद व हितचिंतक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी सभापती तथा संचालक विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील बँकेने 330 कोटींचा आर्थिक व्यवसाय केला आहे.सातत्याने बँकेला आडिट वर्ग 'अ' मिळाला आहे.सध्या बकेत 216 कोटी 78 लाखांच्या ठेवी असून 115 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. भविष्यात सोने तारण कर्ज वाढविणे गरजेचे आहे.बँकेचे 10 हजार 700 हून अधिक सभासद आहेत.बँकेकडे 6 कोटी 34 रुपये भागभांडवल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती विक्रमसिंह शिंदे,संचालक गणेश काशीद,ॲड.नानासाहेब शेंडे,राजेंद्र पाटील,दिगंबर माळी,अमित पाटील,अरविंद नाईकवाडे,सरपंच अशोक शिंदे, नगरसेवक राजू गोटे,शहाजी चवरे,राजेंद्र गुंड,महेश भांगे, अनिकेत चवरे,भारत खंडागळे, रमेश थोरात,सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम,राजकुमार भोळे,निलेश कुलकर्णी यांच्यासह बँकचे सभासद ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक उपस्थित होते.
0 Comments