डॉ.कमलादेवी आवटे यांचा सहसंचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार
माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माजी प्राचार्या तथा महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ येथे प्राचार्य पदावर कार्यरत डॉ.कमलादेवी श्रीधर आवटे यांना पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत सहसंचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा माढा तालुकावासीय यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहसंचालक डॉ.कमलादेवी आवटे यांनी सांगितले की,मला सहसंचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल जो माढा तालुकावासीय यांच्या वतीने माझ्या कार्यालयात येऊन सत्कार करण्यात आला त्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे.या पदाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन दरबारी वरिष्ठांकडे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तानाजी देशमुख,विठ्ठलवाडीचे सहाय्यक आयुक्त प्रशांत उबाळे,आकाश खैरे,धानोरे देवीचे सुरज देशमुख,माढ्याचे रोहन जुगदार,सहदेव खैरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments