मोडनिंबकरांसह आठवडा बाजारकरूनाही मास्कचे वावडे ..

मोडनिंब (क.वृ.): कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आधार वाटत आहे. सर्व ठिकाणी नागरिक बेफिकीरपणे सोडत नाहीत. शनिवारी ५ डिसेंबर रोजी मोडनिंब च्या आठवडा बाजारांमध्ये बाजारकरू तसेच विक्रेते यांच्यासह अनेक नागरिक मास्क न लावता दिसत होते.
मोडनिंब येथे जनावरे तसेच शेळ्या-मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो. जिल्ह्यातील मोठ्या बाजारांमध्ये मोडनिंब बाजाराचा समावेश होतो. जनावरांचे व्यापारी, शेळ्यांचे व्यापारी खरेदीदार तसेच आठवडा बाजारकरू विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालून सर्व नागरिकांना मास्क वापरण्या संदर्भात सक्त सूचना देण्याची गरज आहे. अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होते आहे. ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकू येत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
0 Comments