कमी खर्चात बनवले शून्य ऊर्जेवर आधारित 'शीत कक्ष'

मोडनिंब (क.वृ.): अरण येथील काजल यशवंत शिंदे या विद्यार्थीनीने ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत कमी खर्चात शून्य ऊर्जेवर आधारित 'शीत कक्ष' उभारले आहे. काजल हि आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथे शिक्षण घेत आहे. हनुमंत घाडगे व बंडोपंत घाडगे यांच्या शेतात तीने शितकक्ष उभारून प्रात्यक्षिक सादर केले.
शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष कशा प्रकारे फायदेशीर ठरते, उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीत कक्षा चा वापर करून फळे व पालेभाज्यांची साठवण कालावधी वाढविता येतो. याबाबत काजल ने उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.टी. मुंडे, प्रा. डॉ. भुतडा, प्रा. धुळगंड,प्रा. खेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments