छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


सोलापूर (क.वृ.): छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड च्यावतीने ६ डिसेंबर सकाळी ७ वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वभुषण, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष फारुक शेख, शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान, अॕडव्होकेट सैफन शेख, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख, शहर उपाध्यक्ष जावीद बद्दी, शफीक रचभरे,भागनगरी,उजेर बागवान,रियाज पैलवान,सलीम मुतवल्ली,शहर युवा अध्यक्ष अयाज दिना व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.सर्वजण मास्कलावून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केलेले दिसून आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष फारुक शेख, व शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर बाबतीत आपले विचार मांडले.
0 Comments