धक्कादायक...! 'डॉक्टर'च्याच उपचारासाठी डॉक्टरांचा हलगर्जीपण
पंढरपूर येथील मोहिते हॉस्पिटल व लाईफलाईन हॉस्पिटलमुळे डॉ.प्रतिभा व्यवहारे यांचा मृत्यू झाल्याचा डॉ.अमित व्यवहारे यांची पोलिसांमध्ये तक्रार
कुरुल (कटूसत्य वृत्त):- उत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ, निष्कलंक राजकारणी, जीवा असणाऱ्या समाजसेविका अशी अनेक बिरूदावली मिळवणाऱ्या पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ.प्रतिभा अमित व्यवहारे यांचे १ डिसेंबर रोजी निधन झाले. मात्र पंढरपूर येथील डॉ.पी.बी. मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल व डॉ.संजय देशमुख व डॉ. मंजुषा देशमुख यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल येथील हलगर्जीपणामुळे डॉ. प्रतिभा व्यवहारे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचे पती डॉ. अमित मधुकर व्यवहारे यांनी मोहोळ पोलिसांमध्ये दिली आहे. या तक्रारीमुळे एका डॉक्टरच्या उपचारासंदर्भात डॉक्टरांकडूनच हलगर्जीपणा होत असेल तर सर्वसामान्य रुग्णांचं काय..? असा भयंकर सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून पोलीस कशा पद्धतीने तपास करतात व मोहिते हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटल यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत डॉ. अमित व्यवहारे यांनी तक्रारी अर्जात पुढे म्हटले आहे की, माझी पत्नी डॉ.प्रतिभा अमित व्यवहारे ही ७ महिन्यांची गरोदर होती. दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता पत्नीस अचानक रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे मी तिला घेऊन पंढरपूर येथील डॉ.पी.बी. मोहिते यांच्या हॉस्पीटलला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी माझ्या पत्नीच्या तब्येतीची दखल न घेता गांभीर्याने उपचार न करता वेळकाढूपणा करत उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत तुम्ही तुमच्या पत्नीस पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पीटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मी माझ्या पत्नीस लाईफलाईन हॉस्पीटमध्ये दाखल केले. तेथे डॉ. संजय देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. मंजुषा देशमुख हे दोघे होते. त्यांनी माझे पत्नीची तपासणी केली. त्यांनी देखील माझे पत्नीच्या तब्येतीची व संभाव्य परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली नाही. संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढील उपचारासाठी जाण्यास सांगायला पाहिजे होते मात्र रात्रभर त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. सकाळी देखील त्यांनी उपचारा संदर्भात व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. रक्तस्त्राव व वेदना वाढू लागल्याने पोटात बाळ दगावले त्यामुळे आम्ही डॉ. प्रतिभा हीच आम्ही यशोधरा हॉस्पिटल येथे दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी आम्हाला पेशंट वर तातडीने उपचार न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे तिचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे, असे सांगितले. तरीदेखील त्यांनी उपचार केले. उपचारानंतर ती ठीक झाली होती. मात्र हाच उपचार रात्री रक्तस्त्राव होण्याअगोदर झाला तर अनर्थ टळला असता. दुर्दैवाने माझी पत्नी दि. ०१ डिसेंबर २०२५ रोजी दगावली. सदर घटनेमुळे मला मोठा मानसिक धक्का बसला होता असे त्यांनी तक्रारीत म्हटले असून माझी पत्नी डॉ. प्रतिभा हिच्या मृत्यूस डॉ. पी. बी मोहिते, डॉ.संजय देशमुख व डॉ. मंजुषा देशमुख यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार त्यांनी मोहोळ पोलिसात दिलेली आहे.
चौकट सांत्वनपर भेट नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे स्टेटस
- डॉ. प्रतिभा हिचा मृत्यू झाल्यानंतर माणुसकीच्या नात्याने माझ्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फासणाऱ्या या लोकांचा ना एखादा फोन आहे ना सांत्वन पर भेट दिली. उलट आम्ही कायदेशीर बाजूने जाणार आहोत असे कळल्यावर माझ्या नातेवाईकांना दवाखान्यातून हुसकावून लावले. शिवाय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटीचे व कार्यक्रमांचे जुने फोटो स्टेटसला लावले जातात असे डॉ. अमित व्यवहारे यांनी सांगितले.
दरम्यान सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले तोपर्यंत रक्ताचा रिपोर्टिंग मिळाला. रक्त कमी असल्याने पुढे पाठवले. डॉ.अमित व्यवहारे बरोबर होते. वेळ काढू पण करण्याचा प्रश्नच नाही, पंधरा मिनिट देखील त्या आमच्याकडे नव्हत्या. आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असल्याने आम्ही पुढे पाठवले असे डॉ. पी. बी. मोहिते यांनी तर तो पेशंट माझ्याकडे दुसऱ्या हॉस्पिटल मधून आला होता.पेशंट ऑलरेडी बाळ गेलेला आला होता. पेशंट पहिल्यांदाच आमच्या हॉस्पिटलला आला होता. ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या त्या केल्या.यात आमची काय चूक आहे.पेशंटच्या हार्ट ला बहुतेक होल असावे.तो पेशंट सिरीयस होता. हलगर्जीपणा केला नाही. तो पेशंट फक्त चार तास हॉस्पिटलमध्ये होता. टेबल करून हायर सेंटरला पाठवले. दुसऱ्या हॉस्पिटलचा सिरीयस पेशंट आपल्या हॉस्पिटलला घेणं ही जबाबदारी आहे. त्याला जे घटक कमी आहेत ते देखील देण्याची जबाबदारी आहे असे डॉ.मंजुषा देशमख यांनी सांगितले.
0 Comments