Ads

Ads Area

यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह ७४ भाविकाही केली कायद्याची पायमल्ली म्हणून झाले गुन्हे दाखल

 यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह ७४ भाविकाही केली कायद्याची पायमल्ली म्हणून झाले गुन्हे दाखल


मंगळवेढा (क.वृ.) :- मंगळवेडा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमाबंदीचा आदेश लागू केला होता. असं असतानाच त्याच पूर्व संध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती. शेकडो लोकांच्या संख्येनं गावकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा सुरू असताना पोलिसांनी गावकऱ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. पण, गर्दी वाढतच चालली होती. त्यामुळे यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर येत आहे.
   गेल्या ८ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक धार्मिक स्थळ बंद करण्यात आली होती. मात्र सरकार ने राज्यातील सर्व बंद असलेली धार्मिक स्थळ भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान राज्यातील सर्वच देवस्थानांनी नियम अटींचे पालन करत मंदिरांची दार भाविकांनी दर्शन घेण्यासाठी उघडली आहेत. मात्र, यादरम्यान मंगळवेढ्यात एक मोठी घडली आहे. जमावबंदीचा आदेश तोडल्यामुळे यात्रेत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडीओ देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह ७४ जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणाची फिर्याद गुप्तवार्ता विभागाचे राजकुमार ढोबळे यांनी दिली. कोरोनाचा साखळी वाढू नये म्हणून शासनाने जमावबंदीचा आदेश दिल्यामुळे तालुक्यांमध्ये गैबीपीर उरूस, गणेशोत्सव, नवरात्र, लक्ष्मी दहिवडी येथील यात्रा, हुन्नूर येथील भेट सोहळा असे तालुक्यात होणारे मोठे कार्यक्रम रद्द झाले होते. दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पालख्यासोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली.

ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात दरवर्षी आयोजित केला जातो

कोरोनाची रुग्णांची संख्या जरी कमी झाली असेल तरी मात्र कोरोना संपला असे नाही. कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून शासनाने जमावबंदीचा आदेश दिल्यामुळे तालुक्यांमध्ये गैबीपीर उरूस, गणेशोत्सव, नवरात्र, लक्ष्मी दहिवडी येथील यात्रा, हुन्नूर येथील भेट सोहळा असे तालुक्यात होणारे मोठे कार्यक्रम रद्द झाले होते. दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान या परिसरात शिलवंती(उमरगा), बिरोबा(शिरढोण), विठोबा(सोन्याळ,जत), जकाराया(येणकी), बिराप्पा(जिरअंकलगी), बिरोबा(हुन्नूर), मड्डी जकराया, महालिंगराया(हुलजंती),या गावातील ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात दरवर्षी आयोजित केला जातो.
सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही
याही वर्षी या सोहळ्या दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावला नाही व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दलचा ठपका ठेवून देवस्थान कमिटी आणि भेटीसाठी आलेल्या पालखीसोबत च्या भाविकांसह एकूण ७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close