Ads

Ads Area

पठ्ठ्या !! नववी नापास,तरीही मुख्याध्यापक, जि. प.माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पठ्ठ्या!! नववी नापास,तरीही मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

भास्कर बाबर, "हिंमत" असेल तर डोंगरगाव येथील "त्या" मुख्याध्यापकावर कारवाई करून दाखवा, संस्था अध्यक्षांची मागणी


    सोलापूर (विशेष प्रतिनिधी):- शिक्षण हे सध्याच्या युगात अतिशय पवित्र क्षेत्र समजले जाते. पण याच क्षेत्रातील काळाबाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव ता.सांगोला येथील मॅनेज करण्यात "हातखंडा" असा आरोप होत असलेले मुख्याध्यापक तात्यासो गोरख उतळे हे इयत्ता नववी नापास असून गैरमार्गाचा आणि जन. रजि.१ मध्ये खाडाखोड करून इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेवून संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नव्याने रुजू झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर,आपल्यात " हिंमत "असेल तर मुख्याध्यापक उतळे यांच्यावर योग्य ती कारवाई करा,अशी मागणी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.वारंवार माध्यमिक शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवून ही संस्था अध्यक्षांच्या मागणीवर कारवाई करण्याची हिंमत कोणीच दाखविली नाही. म्हणून आता तरी शिक्षणाधिकारी कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे .
      सन-1981साली मुख्याध्यापक उतळे हे विवेक वर्धिनी हायस्कूल व ज्यु कॉलेज, पंढरपूर येथे इयत्ता नववी नापास असल्याची नोंद असून त्यांचा दाखला रजिस्टर नंबर ४१३२ आहे.तसेच  त्यांनी सन 1981 साली इयत्ता दहावी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे प्रवेश घेतला आहे. त्याचा रजिस्टर नंबर २०२९ आहे.सदर माहितीनुसार इयत्ता नववी मध्ये नापास असताना ही " बहादर " उतळे यांनी इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेतलेला आहे.सदर बाब अतिशय गंभीर असून त्यांनी संस्थेची व शासनाची मोठी गंभीर  फसवणूक केलेली आहे, तरी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, ही बाब गंभीर असून त्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत त्यांना सेवेतून बडतर्फ करावे व त्यांनी आज पर्यंत घेतलेले वेतन पूर्णपणे शासनाने जमा करून घ्यावे.अशी ही  मागणी संस्थेच्या अध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
     संस्था अध्यक्षांनी पत्रात नमूद केले आहे की, सर्व कागदपत्राचे पुरावे देऊन सुद्धा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर,शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत,जाणून-बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, तरी त्यांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून मुख्याध्यापक तात्यासो उतळे  व त्यांना मदत करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावर सक्त कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ डोंगरगाव यांनी केली आहे.अनेक पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तत्कालीन गट शिक्षणाधिकारी सांगोला यांच्याकडे सदर प्रकरणासाठी चौकशीकामी नेमणूक केली होती, त्या चौकशीच्या अहवालामध्ये गटशिक्षणधिकारी यांनी  मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव हे जून 1981 साली विवेक वर्धिनी हायस्कूल पंढरपूर येथे नववी मध्ये उत्तीर्ण असल्याचा दाखला दिला असून त्यानुसार न्यू इंग्लिश स्कूल सांगोला या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेतले बाबत ची नोंद आहे. तसेच त्यांच्या व्यवसायिक पात्रतेबाबत कोणतीही तक्रार नाही आणि विवेक वर्धिनी हायस्कुल पंढरपूर यांनी 16 जून 1981 रोजी उतळे हे  उत्तीर्ण असल्याबाबतचा दाखला 37 वर्षापूर्वीच दिलेला असताना याच शाळेने 2017 साली उतळे हे नापास असल्याबाबत दाखला दिलेला आहे.असे अहवालात नमूद केले आहे.  

      $$ विवेक वर्धिनी हायस्कुल येथील मुख्याध्यापक भुताडे सर  यांना  विचारले असता ते म्हणाले की मी पदभार घेवून तीन महिने झाले आहेत. मी घेतलेल्या माहिती प्रमाणे उतळे प्रकरणांची चौकशी समिती नेमली होती.आणि आता सध्या हे प्रकरण न्यायलयीन असल्याचे समजते,त्यामुळे मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही, असे सांगून विषयाला बगल दिली.
      तर तक्रारदारांनी ज्यावेळेस माहिती अधिकारांतून माहिती विचारली तेव्हा चे तत्कालीन मुख्याध्यापकांनी मात्र १९८१ साली नववी नापासच आहेत. तशी नोंदच आमच्याकडे आहे. त्यामुळे ते आमच्या शालेय दप्तरामधील नोंदीनुसार उतळे हे नापासच आहेत,असे ठामपणे आणि उघडपणे सांगितले होते. RTI अंतर्गत माहिती अधिकारात मागविलेल्या अर्जातही नववी नापास असल्याची नोंद दाखल्याद्वारे उघड होते आहे.तरी अशा बोगस मुख्याध्यापकावर कारवाई करावी, अशी मागणी संस्था अध्यक्षांनी केली आहे." $$

    $$ सदर घटनेबद्दल मुख्याध्यापक उतळे यांना भ्रमणध्वनी द्वारे विचारले असता, असा बोगस दाखला किंवा त्यावर खाडाखोड केली नाही.सत्य काही आहे,ते उघड होईल.मला मानसिक त्रास देण्याच्या हेतूने कटकारस्थाने चालू असून लवकरच मी तक्रारदारावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. $$

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

close