Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण सेवा मंचच्या वतीने यंदाची दिवाळी वंचितांच्या द्वारी - अभिनव उपक्रम

शिक्षण सेवा मंचच्या वतीने यंदाची दिवाळी वंचितांच्या द्वारी - अभिनव उपक्रम

सांगोला, (क.वृ.): भोसे (सुनिल अडगळे) देवडे व खेडभोसे येथील गरजवंत पुरग्रस्त अडचणीतील वंचित विद्यार्थ्यांना फटाक्या ऐवजी शैक्षणिक साहित्याची मदत करणे आणि धाडसी होडीचालकाचा संपूर्ण कपड्याच्या आहेरासह यथोचित सन्मान करणे. हे शिक्षण सेवा मंचचे कार्य संपूर्ण समाजाला प्रेरणादायी आहे.असे मत पंढरपूर तालुका शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे यांनी व्यक्त केले.

शिक्षण सेवा मंच पंढरपूरच्या वतीने आयोजित यंदाची दिवाळी वंचितांच्या घरी या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  नारायण शिंदे आणि प्रमुख पाहुणे पं. स. पंढरपूरचे शिक्षणविस्ताराधिकारी मारुती लिगाडे यांनीही या कार्याचे कौतुक केले.मंचावर कृषी विद्यालय देवडेचे मुख्याध्यापक मोहन गाजरे,स्कुल कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग झांबरे, बाळासाहेब शिंदे,सुभाष कडलासकर,संयोजन समितीचे सुनिल अडगळे,ता. तो. कांबळे आदी उपस्थित होते.

कोरणाच्या जागतिक महामारीचे महासंकट आणि त्यातच महापुरामुळे उध्वस्त झालेला संसार अशा अनंत अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला शिक्षण सेवा मंचने मानवतेच्या नात्याने मदत केली. भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावातील असंख्य संसार पाण्याखाली गेले. संसारोपयोगी साहित्याबरोबरच मुलांचे शैक्षणिक  साहित्यही त्यामध्ये वाहून गेले. अशा मुलांचे भविष्‍यातील शिक्षण सोयीस्कर व्हावे म्हणुन शिक्षण सेवा मंच पंढरपूरच्या वतीने या पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  फटाक्या ऐवजी पुस्तके या अभियानांतर्गत वह्या आणि लेखन साहित्य देऊन या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्यात आला. 

तसेच यावेळी तलाठी प्रकाश भिंगारे यांच्या सतर्कतेमुळे देवडे येथील भीमा नदीच्या महापुरामध्ये मध्यरात्री दोन  वाजता प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात होडी घालून अडकलेल्या नऊ जणांचे प्राण वाचवल्याबद्दल होडी चालक रमेश भाई यांचा संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ झांबरे,मधूकरलांडगे, विजय वाघमारे, भा. रु. लोखंडे, नवनाथ लांडगे, रावसाहेब फाळके, दत्तात्रय वाघमारे, अनिल लोखंडे, प्रकाश खिलारे, सतिश रणदिवे, सत्यवान वाघमारे,सुभाष लोखंडे, पांडुरंग नाईकनवरे, महादेव लोखंडे आदींनी सहकार्य केले.

Reactions

Post a Comment

0 Comments