Ads

Ads Area

ॲमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी - भाविक वारकरी मंडळ

ॲमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी - भाविक वारकरी मंडळ



सोलापूर, (क.वृ.): ॲमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची अंतरवस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशात सुरु केली आहेत. हा आमच्या संस्कृतीचा व परंपरेचा अपमान आहे. जाणीव पूर्वक अशा गोष्टी करून कंपनीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक कंपनीकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो . कारण भारतात सेक्युलर या मानसिकतेमुळे काहीही केले तरी चालते असा समज अनेकांचा आहे. पण ते चालू दिले जाणार नाही. प्रसिद्धी साठी आमच्या भावना दुखावून जर कुणी स्वतःचा स्वार्थ साधत असेल आणि आमच्या परंपरेचा अपमान करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. 

ॲमेझॉन कंपनीचा अखिल भाविक वारकरी मंडळाचे वतीने आम्ही जाहीर निषेध करतो.ॲमेझॉन कंपनीवर सर्वांनी बहिष्कार टाकून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले. या ॲमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी ईमेलद्वारे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पंतप्रधान कार्यालयला करत आहोत. सोलापूरमध्ये ॲमेझॉन कंपनीच्या लोगोची होळी करून भाविकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष ), जगन्नाथ सुतार, बजरंग डांगे, कृष्णदेव बेलेराव, तुकाराम जांभळे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close