करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप

करमाळा (क.वृ.): राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष सोमनाथ लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करमाळा पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस कार्यालय,तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधवाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस बांधवाना दिवाळी सणानिमित्त फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, पदवीधर तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.अजिनाथ शिंदे, करमाळा विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील,तालुका उपाध्यक्ष बंटी फरतडे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, शहराध्यक्ष ओंकार पलंगे, महेश मोरे, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुका कार्याध्यक्ष सचिन नलवडे, युवक नेते चंद्रकांत जगदाळे,अनिल कांबळे,सूरज लोहार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments