शिक्षकांचे हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी टीडीएफचे अधिकृत उमेदवार जी .के.थोरात यांना विजयी करावे- भारत इंगवले
सांगोला (क.वृ):- गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र मदतीला धावून येणारी संघटना म्हणून टी डी एफ संघटनेकडे पाहिले जाते. पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020 या निवडणुकीसाठी 40 वर्षांपूर्वीची संघटना व ज्या संघटनेने शिक्षकांना हक्काचा पगार बँकेत मिळवून दिले, शिक्षकांना स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली, शिक्षकांना संस्थापकाच्या जाचातून मुक्त केले व शिक्षकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारी संघटना म्हणून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच टीडीएफ या संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला आहे,या संघटनेचे उमेदवार जी.के.थोरात यांना पसंती क्रमांक एकचे मत देवून विजयी करावे,असे आवाहन सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष भारत इंगवले सर यांनी केले आहे.
पुढे भारत इंगवले म्हणाले की,या संघटनेच्या माजी आमदारांचे कार्य आत्तापर्यंत उल्लेखनीय केलेले आहे. परंतु सध्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्र विधान परिषदे मधील फक्त कपिल पाटील सोडले तर कुठल्याही आमदारांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवलेला नाही आणि हा त्रास गेल्या बारा वर्षापासून चालू आहे.तो त्रास संपवायचा असेल तर टीडीएफचे उमेदवार जी. के. थोरात यांना संधी दिली पाहिजे,असेही ते या वेळी म्हणाले. त्यांच्या विजयासाठी जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी यांचे प्रयत्न चालू आहेत. तसेच शिक्षक लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांचा पाठिंबा संघटनेचे अधिकृत उमेदवार जी. के.थोरात यांनाच आहे.
0 Comments