Hot Posts

6/recent/ticker-posts

वाढीव विज बिलासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार

  वाढीव विज बिलासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार




        सांगोला (प्रतिनिधी) - गेल्या सहा-सात महिन्यातील लाॅकडाऊन काळामधील वाढीव वीज बिल माफ करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज  ठाकरे व दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद  बाबर यांनी सांगितले.
        गेल्या सहा-सात महिन्यांपासून संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या काळात नागरिकांच्या हाताला काम धंदा नसल्याने उपासमारीची वेळ आली असूनही प्रशासन वाढीव वीज बिल माफ करण्याचे सोडून कोरोना काळातील वाढीव वीज बिल भरण्याची सक्ती करत आहेत. सामान्य नागरिकांवर अक्षरशः या भरमसाठ विजबील वसुलीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. विज महामंडळ साधारण एका एका नागरिकाच्या नावे १०-१० हजार विजबील थकित दाखवत आहेत. लाॅक डाऊनच्या काळात घरोघरी जाऊन रिडींग न घेता अंदाजे सरसकट सहा महिन्याची भरमसाठ वीज बिले काढली आहेत. खरं तर एवढा वीज वापर झालाच नाही, परंतु वीज कंपन्या सामान्य जनतेची लूट करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभरात दिसत आहे. यामुळे जनतेला सहन करायला लागत असलेल्या अन्यायाची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व दिलीप बापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सोमवारच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी सांगितले. तसेच वाढीव वीज बिल न भरल्यास कोणत्याही वीज महामंडळ कर्मचाऱ्याने विज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसेचा दणका दिला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments