धनगर समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जानकर
दत्तात्रय (भाऊ) जानकर

सांगोला :- २०२०-२०२१ सालाकरिता धनगर समाज सेवा मंडळ, सांगोलाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय (भाऊ) जानकर यांची फेरनिवड करण्यात आली. दिपावली पाडव्याच्या शुभमुर्हुतावर शहरातील समाज मंदिरात धनगर समाज सेवा मंडळ, सांगोला यांच्या पदाधिकारी, सदस्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीमध्ये पदाधिकार्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या.
यामध्ये उपाध्यक्षपदी दत्तात्रय बंडगर, सचिवपदी बंडोपंत येडगे तर खजिनदारपदी राजाभाऊ मदने यांची निवड करण्यात आली. संचालक म्हणून सुरेश कोळेकर, कामाजी नायकुडे, युवराज माने, बिरुदेव शिंगाडे, दिलीप नरुटे, ज्ञानेश्वर गाडेकर, भिवा मेटकरी, सुरेश गावडे, बाळासाहेब व्हटे, भिमराव देवकते, दिलीप मस्के यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार म्हणून प्रा.संजय शिंगाडे, बाळासाहेब गावडे, चिंतामणी माने, संदिपान नरुटे, आनंदा व्हटे, बापूराव जानकर यांची फेरनिवड करण्यात आली.
सदर बैठकीस धनगर समाजातील युवक वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन अध्यक्ष दत्तात्रय(भाऊ) जानकर सर्व समाजबांधवांचे आभार मानले.
0 Comments