Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथील देवस्थान च्या जमिनीसाठी खरेदी-विक्री थांबवा राजकुमार बाबा धोत्रे

 टेंभुर्णी येथील देवस्थान च्या जमिनीसाठी खरेदी-विक्री थांबवा राजकुमार बाबा धोत्रे



अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचा माढा तहसील समोर उपोषण करण्याचा  इशारा

टेंभुर्णी, (क.वृ.): वडार समाजाचा आद्य पुरुष हनुमान तथा मारुती देवस्थानच्या टेंभुर्णी येथील जमिनीची अवैधरित्या होणारी खरेदी विक्री थांबवावी या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या वतीने माढा तहसील समोर उपोषणाचे निवेदन देण्यात आले, असून वडार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या मारुती देवस्थानच्या नावे तेंभूर्णी मध्ये असणारी जमीन ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यांनी परस्पर बिगर शेती करून विक्रीस काढल्याने टेंभुर्णी तील गाव दैवत मारुती व्यवस्थांची दरवर्षी भरणारी यात्रा अडचणीत येऊ शकते या उद्देशाने वडार समाज संघटना मारुती देवस्थान ट्रस्ट च्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यास विरोध असल्याने वडार समाज संघटनेच्या वतीने माढा तहसील समोर लक्षणे उपोषणाचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार तथा बाबा धोत्रे यांनी म्हटले आहे की दरवर्षी मारुती देवस्थान यात्रा गाव यात्रा म्हणून साजरी होते गावातील 25000 पब्लिक यात्रेला जमा होते या देवस्थानांच्या मालकीची असणारी जमीन या जमिनीतील उत्पन्नाच्या माध्यमातून यात्रेचा खर्च केला जातो परंतु गावातील जनतेला विश्वासात न घेता आजच्या काही पदाधिकाऱ्यांनी या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी महसूल मधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिगर शेती करून विक्री करण्याचा घाट घातला आहे, त्यामुळे याच देवस्थानच्या यात्रेवर व गावातील हनुमान भक्तांच्या श्रद्धेवर यातून गाव घातला जात आहे तो त्वरित थांबवुन या जमिनीची बेकायदेशीररित्या होणारी बिगर शेती करण व खरेदी विक्री त्वरित थांबवावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्या वतीने काही दिवसाचे लक्षणे उपोषण माढा तहसील समोर करण्यात येणार असून या उपोषणाची दखल घेऊन या जमिनीचे होणारे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार त्वरित न थांबल्यास वडार समाजाचे आराध्य दैवत मारुती देवस्थानच्या जमिनीसाठी महाराष्ट्रभर या जमिनीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा धोत्रे यांनी सांगितले.
तसे पाहता वडार समाज संघटनेचे अध्यक्ष होत असलेल्या मारुती देवस्थान जमीन या समाजाला विचारात न घेता बिगर शेती करून लाखो रुपये किमतीने गुंठेवारी पाडून लोकांना विकण्यात येत आहे यातून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपये मधून महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर हप्ता देऊन हे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे परंतु याची त्वरित कारण करून या गावातील जनतेला विचारात न घेता हे व्यवहार पार पडला महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्यात येईल असे वक्तव्य राजकुमार धोत्रे यांनी केले असून दिनांक वीस पासून माढा तहसील समोर ते उपोषणास बसणार आहेत या उपोषणाची दखल घेऊन हे प्रकरण त्वरित न थांबल्यास वडार समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असे बाबा धोत्रे यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments