गोपिचंद पडळकर विरोधात गुन्हा दाखल करा शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणची निवेदनाद्वारे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2020

गोपिचंद पडळकर विरोधात गुन्हा दाखल करा शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणची निवेदनाद्वारे मागणी

गोपिचंद पडळकर विरोधात गुन्हा दाखल करा
शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणची निवेदनाद्वारे मागणी


 हे निवेदन रेवण जाधव,संदीप मुटकुळे आणि विकास घोलप आदी उपस्थित होते.
सोलापूर(क.वृ.): राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा,आमचे श्रध्दास्थान शरदचंद्र पवार यांच्या बद्दल भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी अतिशय निंदनिय,संतापजनक व जनमानासात उद्रेक निर्माण करणारे वक्तव्य केले आहे.त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना गणेश गोडसे म्हणाले की,आदरणिय शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ दिले अनेक वेळा अडचणीत आलेली साखर कारखानदारी सांभाळली तर देशाचे कृषिमंत्री असताना देशातील सर्वात मोठी पहिली कर्जमाफी शरद पवार यांनी केली. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करीत असलेल्या ज्येष्ठ नेत्या बाबत अशा पद्धतीची टीका करणे गोपीचंद पडळकर यांना शोभत नाही राज्यात सामाजिक सलोखा बिघडविण्यास अनेक वर्ष कारणीभूत ठरलेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनाबाबत शरद पवार यांनी ठाम भूमिका घेऊन नामांतर केले. अनुसूचित जाती जमाती वर होणार्‍या जातीय अत्याचाराविरोधात त्यांच्याच काळात कायदा बनविण्यात आला.अशा आमच्या दैवताबद्दल आदरणिय शरचंद्रजी पवार साहेबांबद्दल गोपिचंद पडळकर याने काढलेले उदगार हे आमच्या भावना दुखावणारे व राज्यात विद्वेष भडकावणारे चिथावणीखोर वक्तव्य आहे.त्यामुळे गोपिचंद पडळकर याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages