महापुरुषांच्या आदर्शवत विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव ढोबळे-प्रा.सर्फराज खतीब - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 21, 2020

महापुरुषांच्या आदर्शवत विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव ढोबळे-प्रा.सर्फराज खतीब

महापुरुषांच्या आदर्शवत विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव ढोबळे--प्रा.सर्फराज खतीब


प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप


सांगोला (जगन्नाथ साठे ) संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाची ज्ञानगंगोत्री प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचली पाहिजे ,हा विचार मनात ठेवून,फुले शाहू,आंबेडकर,आणाभाऊ साठे,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या आदर्शवत विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी मंत्री तथा शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे सर आहेत.आज ही त्यांच्या मनात शिक्षणाबद्दलची आस्था दिसून येत आहे, आज राजकारण,समाजकारण,शिक्षण,उद्योगात त्यांचा वावर आहे.महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वैभवात नक्कीच त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सध्याची कोरोना ची स्थिती पाहता आणि लोकांना लॉक डाऊन च्या काळात जगणे मुश्किल झाले आहेत, व्यवसाय व उद्योग बंद आहेत,हीच समाजमनाची जाणीव ठेवून शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आणि सांगोला येथील गीता बनकर बी.एड.कॉलेज आणि डी.एड.कॉलेज, मातोश्री गिरीजाबाई ढोबळे प्राथमिक,माध्यमिक,ज्यू कॉलेज,सांगोला च्या माध्यमातून लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनगर ता सांगोला येथे चाळीस गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले, असून या पुढे ही नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातील,अशी माहिती प्राचार्य सर्फराज खतीब यांनी दिली.


         सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून इतर खर्चाला फाटा देत सांगोला संकुलाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले,या वेळी लक्ष्मीनगर गावचे सरपंच
 नितीन नरळे,उपसरपंच धनाजी नरळे, प्राचार्य सर्फराज खतीब,प्रा कानगुडे सर, तुकाराम साठे,भगवान साठे कोविड वारीयर्स,रणधीर साठे,दत्तात्रय साठे,पोलीस पाटील सोमनाथ नरळे,पत्रकार जगन्नाथ साठे,पत्रकार मोहन शिंदे,पुण्यवंत साठे,लाला साठे, उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टन्स ठेवून या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी प्रा लक्ष्मणराव ढोबळे आणि शाहू शिक्षण परिवाराचे आभार मानून,सरांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त केली.

  सदर किटचे वाटप करतेवेळी,प्राचार्य सर्फराज खतीब,प्रा कानगुडे सर, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ही मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages