क्वारनटाइन व्यक्तींनी केली पाचेगाव बुद्रुक शाळेची स्वच्छता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 21, 2020

क्वारनटाइन व्यक्तींनी केली पाचेगाव बुद्रुक शाळेची स्वच्छता

क्वारनटाइन व्यक्तींनी केली पाचेगाव बुद्रुक शाळेची स्वच्छता


सांगोला (प्रतिनिधी) लॉकडाउन च्या काळात मुंबई, पुणे येथून सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथे आलेल्या लोकांना पाचेगावातील प्राथमिक शाळेत क्वारनटाइन करण्यात आले.ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे आपण देणे लागतो या भावनेने क्वारनटाईन झालेल्या लोकांनी शाळेच्या खोल्या,व्हरांडा धुऊन स्वच्छ केला.शाळेचे मैदान सर्व परिसर चकाचक केला.कोरोना च्या काळात सुद्धा सकारात्मक विचार  करून शाळेसाठी केलेले कार्य निश्चित कौतुकास्पद व इतरांना अनुकरणीय आहे.त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर घोडके गुरुजीनी पाणी,शौचालय त्याच बरोबर सर्व वर्ग खोल्या मध्ये लाईट,पंखा याची उत्तम  सोय केली.यासाठी त्यांना गावचे सरपंच श्री प्रमोद दौंड,ग्रामसेवक श्री पोरे, पोलीस पाटील श्री करचे,तलाठी श्री धनवडे व कृषी अधिकारी श्री गवळी साहेब  व आशा वर्कर सारिका मलमे यांनी सहकार्य केले.संकटाच्या काळात देखील सकारात्मक विचाराने वागल्यास चांगले कार्य घडू शकते याचा आदर्शच पाचेगाव बुद्रुक मधील क्वारनटाइन झालेल्या लोकांमध्ये बघायला मिळाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages