ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर सर्वेक्षणात भर : जिल्हाधिकारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 17, 2020

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर सर्वेक्षणात भर : जिल्हाधिकारी

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर सर्वेक्षणात भर : जिल्हाधिकारी




 सोलापूर  : सोलापूर शहरातील ज्येष्ठ आणि विविध आजारासाठी नियमित उपचार घेणाऱ्या नागरिकांना फोकस करुन सर्व्हेक्षण केले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
श्री. शंभरकर यांनी आज सायंकाळी सनियंत्रण अधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, शहरातील ज्येष्ठ आणि विविध आजारासाठी नियमित उपचार घेणाऱ्या नागरिकांचा डाटा तयार करण्यात आला आहे. यासाठी शहरातील चार झोनमधील असणाऱ्या रेशन कार्ड धारकांची माहिती आणि नियमित उपचार घेणाऱ्या नागरिकांची माहिती डॉक्टरांकडून संकलित करण्यात आली आहे. ही माहिती सोलापूर महानगरपालिकेला देण्यात आली आहे. यानुसार सर्व्हेक्षण केले जाणार आहे.


दरम्यान , आज 37 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. आतापर्यतची  ही सर्वाधिक संख्या आहे, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages