गडचिरोली इथं नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरचे धनाजी व्हनमाने शहीद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 17, 2020

गडचिरोली इथं नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरचे धनाजी व्हनमाने शहीद



गडचिरोली इथं नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरचे धनाजी व्हनमाने शहीद


सोलापूर- गडचिरोली इथं नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी  तानाजी व्हनमाने यांना वीरमरण आलं रविवारी सकाळी भामरागड तालुक्यातील पोरायकोटी कोपरशी जंगलात पोलिसांचे क्यू आर टी पथक आणि नक्षलवादी यांची चकमक झाली यामध्ये धनाजी व्हनमाणे यांनी चार ते पाच नक्षलींचा खात्मा केला यावेळी नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात धनाजी व्हनमाने हे शहिद झाले ते मूळचे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील असून त्यांच्या विरमरणाच वृत्त येताच पुळूज गावावर शोककळा पसरली
धनाजी व्हनमाने  यांना 8 दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांकडून पदक मिळालं होतं राष्ट्रपती पदकासाठी देखील त्यांचं नाव घेण्यात आलं होतं 2013 मध्ये स्पर्धा परिक्षाद्वारे ते पोलीस सेवेत दाखल झाले  पुणे इथल्या मुंढवा  इथे त्यांची पहिली पोस्टिंग होती त्या नंतर गडचिरोली इथे त्यांची बदली झाली होती नक्षलवाद्यांशी सामना करताना अनेक नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलं होत तीन वर्षांचा इथला कार्यकाळ त्यांचा संपलेला होता मात्र लॉक डाऊन मूळ बदली होऊ शकली नाही दरम्यान रविवारी झालेल्या चकमकीत पुळूजच्या या शुरविरास वीरमरण आलं
अतिशय गरिबीतून धनाजी व्हनमाने  हे पुढे आले एक भाऊ असून तोही सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय  तर आई वडील हे शेतीकडे लक्ष देतात धनाजी व्हनमाने  यांचं वर्षभरापूर्वी लग्न जमलेलं होतं काही अवधी मिळताच लग्न समारंभ उरकला जाणार होता मात्र तत्पूर्वीच ते शाहिद झाल्यानं संपूर्ण  पुळूज गाव शोकसागरात बुडालं  उमदा वीर ऐन उमेदीच्या काळात असा शाहिद झाल्यानं व्हनमाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages