चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंदच राहणार मात्र अत्यावश्यक सेवा कार्यालये सुरु: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंदच राहणार मात्र अत्यावश्यक सेवा कार्यालये सुरु: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंदच राहणार
 मात्र अत्यावश्यक सेवा कार्यालये सुरु: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश


            सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चित्रपट गृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदी गर्दी होण्याची शक्यता असणारे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढले. हे आदेश 30 एप्रिल 2020 पर्यंत लागू राहतील.
            या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा नाट्यगृह , वॉटर पार्क, म्युझियम, शहरी व ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालय, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मनोरंजनाची ठिकाणे, पर्यटन केंद्रे, खासगी शिकवणी ही बंद राहतील. शासकीय, निम शासकीय आणि खासगी आस्थापनामध्ये काम करणा-या अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश आहेत.
            उपरोक्त आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड सहिता 1860(45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा संस्था व व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार करावाईस पात्र असतील, असेही आदेशा म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages