सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात दोन दिवसापूर्वी एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर त्या व्यक्तीशी आणि त्याच्याशी संबंधित आलेल्या एकूण 143 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी सायंकाळपर्यंत 91 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. समाधानाची बाब म्हणजे यातील 90 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्यापही या घटनेशी संबंधित 52 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. तसेच आज एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळाली आहे, तिच्याशी संबंधितही सोळा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. याचेही अहवाल उद्या सकाळपर्यंत अपेक्षित आहेत .उद्या एकंदर 68 जणांचे अहवाल अपेक्षित आहेत.
याचा अर्थ आज अखेर सोलापुरात कोरोना बाधित एका व्यक्तीचा मृत्यू आणि एक पॉझिटिव्ह रुग्ण अशी आजवरची स्थिती आहे .

No comments:
Post a Comment