कार्यालयात गर्दी टाळण्याचे
जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळावी, शासकीय कार्यालयामध्ये अत्यावश्यक गरज असल्याशिवाय दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात टपाल शाखेत द्यावे अथवा collectorsolapur@gmail.com या ईमेलवर पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment