सांगोला शहरातील.किराणा दुकान ,बेकरी, भाजीपाल्याची दुकाने,दूध दुकाने,पेट्रोल पंप व इतर दुकाने सकाळी 6 ते 2 या वेळेत सुरू राहतील- कैलास केंद्रे मुख्याधिकारी सा न पा
सांगोला - मा जिल्हाधिकारी सोलापूर यांचा सुधारित आदेशा नुसार सांगोला शहरातील.किराणा दुकान ,बेकरी, भाजीपाल्याची दुकाने,दूध दुग्धजन्य पदार्थ, दुकाने,पेट्रोल पंप , अंडी चिकन, मटण, मासे, खते, कीटकनाशके, बी बियाणे, विक्रते इत्यादी दुकाने यापुढे सदर चे व्यवसाय हे सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरू राहतील. या आदेशाचा भंग करून जर कोणी दुपारी 2 वाजल्यानंतर दुकाने उघडी ठेवल्यास तसेच रस्त्यावर फळे भाजीपाला विक्री करताना आढळून आल्यास सदर व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच दुपारी 2 वाजल्यानंतर कोणताही नागरिक विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम2005 व साथ रोग अधिनियम1897 अन्वये सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीचे आव्हान सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment