#Corona Breaking - सोलापूरात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...एकच खळबळ... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2020

#Corona Breaking - सोलापूरात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...एकच खळबळ...

सोलापूरात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...एकच खळबळ...




सोलापूर- सोलापूरात कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत.यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे.या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे.

सोलापूर शहरात आणखीन दहा कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे .

 जे दोन रुग्ण सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी सापडले .यातील एका मृत  पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक पैकी एक आहे  . तर इतर  पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण पाच्छा पेठ परिसरातीलच आहेत यामुळे सोलापुरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत  बारा इतकी झाली असून, यातील एक व्यक्ती यापूर्वीच मृत्यू पावला आहे.तर बाकी  सर्व 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांनी सरकारी यंत्रणेच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा .सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages