आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने सांगोला बस आगारातील कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप
सांगोला (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्यावतीने सांगोला बस आगारातील वाहक, चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप बुधवारी करण्यात आले.सांगोला बस आगारातील चालक, वाहक प्रवासी ने-आण करण्याचे काम करत आहेत. आपली सेवा देत असताना ते कुठल्याही जीवघेण्या आजाराला बळी पडू नयेत यासाठी सांगोला आगारातील कर्मचार्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बस आगारातील कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप आपुलकी प्रतिष्ठान च्या वतीने मंगळवारी दुपारी बस आगारात करण्यात आले. यावेळी आगारप्रमुख पांडुरंग शिकारे, स्थानक प्रमुख राहुल देशमुख, वाहतूक निरीक्षक सागर कदम, सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान काशीद, वरिष्ठ लिपिक प्रताप टकले, पत्रकार अशोक बनसोडे व बस आगारातील चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी तसेच आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment