नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी शिवतेजसिंह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2020

नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी शिवतेजसिंह

नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी शिवतेजसिंह

अकलूज(  प्रतिनिधी ) जगभरात कोरोना सारख्या प्राणघातक विषाणूने धुमाकूळ घातला असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकलूजच्या जनतेने घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.सध्यास्थितीत पुणे या शहरात काही रुग्णांना या आजाराची लागण झालेले दिसते आहे.अकलूज व परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना या आजाराचे लक्षणे व त्यावर करावयाची उपाययोजना याबाबत माहिती पत्रक संपूर्ण अकलूज गावात घरोघरी वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रत्येक मुख्य चौकात या ठिकाणी माहिती फलक लावून कोरोना आजाराबाबत व त्या अनुषंगाने हाताची स्वच्छता राखणे याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिटाइजरचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच साऊंड सिस्टिमद्वारे या विषाणूजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सांगण्यात येत आहे.तर नागरिकांनी घाबरून न जाता काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा तर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages