जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार ; कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2020

जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार ; कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना

जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने
31 मार्च पर्यंत बंद राहणार
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना  
   
सोलापूर दि. 17 :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व धार्मिक देवस्थाने एकतीस मार्च २०२० पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.
कोरोना विषाणुच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान सर्व देवस्थान प्रमुखांनी देवस्थान दर्शन 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे मान्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ही          बैठक झाली.  
देवस्थान आणि मंदिरातील धार्मिक विधी आणि नित्योपचार सुरु राहतील. पण हे करतांनाही आरोग्य विभागानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देवस्थान प्रमुखांना केले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, मारुती मंदिर, गौडगाव, दर्गाह, हैदरा, सिदेश्वर मंदिर देवस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकांनी गर्दी करु नये, लग्न,  कौटुंबिक समारंभ गर्दी न करता करावेत किंवा शक्य असल्यास लांबणीवर टाकावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. बाजारसमितीतील व्यवहार तीन सत्रात करावेत अशा सूचना बाजार समितीच्या पदाधिका-यांना दिल्या असून त्याची कार्यवाही सूरु होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages