भारतीय स्टेट बँकेची भारतीय स्टेट बँकेचे पैसे भरणा करण्याची मशीन धूळ खात पडून!
कळबं :-गेल्या काही महिन्यांपासून कळबंमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.तर एस बी आय बॅकेची पैसे भरणा करणारी एटीएम मशिन तर गेल्या दोन वर्षा पासुन बंद व धूळरवात पडलेली आहे. असून खोळंबा नसून ओळंबा अशी अवस्था भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया पैसे भरणा करणाऱ्या मशीन एटीएम ची झाली आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद व भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन बँकेचे विलीनीकरण झाल्यापासून ही एटीएम मशीन जुन्या ठिकाणाहून नव्या ठिकाणी स्थलांतरित केली होती त्यानंतर ती सुरळीत केली नसल्यामुळे पैसे भरणा करण्यासाठी बँकेत रांगेमध्ये उभे राहावे लागत असून ही मशीन तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्राहकाकडून तीव्र जोर धरत आहे. ऐन सणा सुदीच्या दिवसात तर बहुतेक एटीएम बंद असल्याने खातेदारांना बँकेच्या लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यातही अनेक बँकांचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. सुटीमुळे बँका बंद राहणार असल्याने अनेक जण पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी एस बी आय एटीएमकडे धाव घेतात परतु पैसे भरणा करणारी मशीनच धुळखात पडली असल्याने खात्यावर पैसे भरण्यासाठी बँकेकडे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बँकेमध्ये लागलेल्या रांगा पाहून ग्राहकांचे हाल होत आहेत.अनेक जण एटीएममध्ये जाऊन नाइलाजाने परत रांगेत उभे राहत होते. बहुतेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने कामकाज ठप्प होते. वैतागलेले बँक कर्मचारी व चिडलेले खातेदार यांचे अनेकदा खटके उडू लागले. बँकेत साधारण दोन-एक तास थांबूनही पैसे मिळाले नसल्याने अनेक खातेदारांना सणासुदीची खरेदी करता आली नाही. बहुतेकांना तर केज ,उस्मानाबाद येथील एटीएम केंद्रांचा आधार घ्यावा लागला.कळंब शहरात विविध बँकांची सहा एटीएम केंद्रे असून गेल्या काही दिवसांपासून ही केंद्रे कधी बंद तर कधी चालु अशी अवस्था आहे. नेहमी २४ तास सेवा देणारी हि एटीएम बंद असल्याने तसेच कळबं शहर सोडून प्रमुख शहरांमध्ये एटीएम सुविधा विना खंडित अहोरात्र सुरु असते पण कळबं शहरात ही सुविधा सुरळीत नसते.ऐन सनासुधीत एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट असल्याने खातेदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.त्यात महत्त्वाच्या बँकांची एटीएम मशीन कायमच बंद असल्याने या बँकेचे खातेदार मेटाकुटीला आले आहेत. खातेदारांना या एटीएममधून दुसऱ्या एटीएम केंद्रामध्ये चकरा मारण्यावरून वाचून पर्याय उरत नाही. पण सर्वच एटीएम केंद्रांवर असाच गलथान कारभार आहे. त्यामुळे खातेदार बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जातात. मात्र बँकांचा सर्व्हर बंद असल्याचे उत्तर मिळत असल्याने लांबच लांब रांगेत उभे राहूनशेवटी रिकाम्या हाती माघारी फिरण्याची वेळ खातेदारांवर येते. यातूनच बँक अधिकारी कर्मचारी व खातेदार यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. प्रमुख शहरांपैकी कळबं एक असून, आजूबाजूच्या सुमारे ७० गावांमधील ग्रामस्थ खरेदी कारणांसाठी शहरात येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये कळबं शहरातील बाजारपेठ व या बाजारपेठेत होणाºया मोठमोठ्या उलाढाली लक्षात घेऊन येथे अनेक बँकांनी आपले बस्तान बसवले आहे. कळंब व आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थांनी सरकारी बँकांच्या ढिसाळ कारभाराला वैतागून या बँकांमध्ये खाती उघडली. मात्र त्यांचेही व्यवहार व खातेदारांना पुरवण्यात येणार्या सुविधा सरकारी बँकेसारख्या होऊ लागल्याने ग्रामीण भागाला कमी का लेखले जाते, असे बोलले जात आहे. भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक जास्त असल्याने बँकेमध्ये होत असलेली गर्दी पाहता याच बँकेची पैसे भरणा करणारी एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांचे हाल होत असून पैसे भरणा करण्यासाठी बँकेत तासन्तास उभे राहावे लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे भरणा करणारी मशीन सुरळीत करून द्यावी अशी मागणी खातेदाराकडून होत आहे.

No comments:
Post a Comment