कळंब येथील आठवडा बाजार जोमात , प्रशासन कोमात शेतकर्यासह व्यापाऱ्याचे चांगभले!
कळंब -(प्रतिनिधी):-संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरत चाललेला कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध खबरदारीचे पाउले उचलली जात आहेत. मात्र कळंब शहर अपवाद वगळता कळंब तालुक्याचा आठवडी बाजार मात्र जोमात भरला होता प्रशासनाने याकडे कसलेही लक्ष दिले नसल्याने या बाजारात अनेक हौशी नवशे येऊन गेल्याची चर्चा मात्र चविने होत आहे. याची झळ ग्रामीण भागातील नागरिकांना बसलो असल्याचेही बोलले जात आहे कळब येथे दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार आज तर फार जोमात भरला होता. त्याच प्रमाणे रविवारीही भाजी मंडई मध्ये बाजारा सारखे स्वरूप आले होते . याकडे मात्र प्रशासनाने कसलेही लक्ष दिले नसल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. संपूर्ण जगात मृत्युचे तांडव घालणारया कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या विविध भागात याचे रुग्ण आढळून येत आहेत. यास उस्मानाबाद जिल्हा अपवाद असून जिल्ह्यात अद्याप तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. शाळा, यात्रा ,महाविद्यालये, थियेटर्स, मॉल्स आदी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही शुकशुकाट निर्माण झाला आहे. पण कळबं शहरांमध्ये मात्र आज या बाजाराच्या निमित्ताने जवळ पाच ते सात हजार लोक एकत्र येऊन बाजारांमध्ये चांगलीच उलढाल झाल्याचे दिसत होते तर याचाच भाग म्हणून बसस्थानकावरील अफाट गर्दी पाहायला मिळाली परिणामी व्यवहार ठप्प होत चालले आहेत. दर सोमवारी कळबंयेथील आठवडी बाजार भरतो. या बाजाराकरिता कळम शहर केज तालुक्यातील बरेच खेड्यातील व कळंब तालुक्यातील अनेक भागातून व परिसरातील गावातील शेतकऱ्यासह व्यावसाईक, बाजारकरू येतात. सोमवारी नेहमीप्रमाणे ही लोक बाजारसाठी कळंब येथे दाखल झाले होते , तर काहींनी आपली दुकानेही लावली होती., असे असताना प्रशासनाने मात्र त्यांना कसलीही विचारणा केली नाही. जिल्ह्यामध्ये मंदिर शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस असे अनेक व्यापारी शो बंद ठेवण्याचे आदेश असतानाही व जमावबंदीचा आदेश लागू असतानाही याकडे मात्र ना तहसीलदार ,पोलिस ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी कसलेही लक्ष न दिल्याने व्यापार यातून आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्री पंडित व तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी न उचलल्याने यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकलो नाही तर नगरपरिषदेला फोन केल्यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने सांगितले की आम्ही आत्ताच आदेश काढले आहेत आणि नगरपरिषदेचे उद्यान आजपासून बंद करण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले आहे

No comments:
Post a Comment