मनोहर सपाटे यांना मराठा मंडळाच्या पदाधिकारी व संचालक यांच्या निवडीचे अधिकार - प्रा. महेश माने
सोलापूर येथीलसेवा मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शनिवार दि. ०७/०३/२०२० रोजी जाहीर होऊन यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, खजिनदार, सेक्रेटरी असे पाच पदाधिकारी व १० संचालक पदासाठी जवळपास ३५ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अध्यक्ष व खजिनदार या दोन पदांची बिनविरोध निवड झालेली आहे. उर्वरित पदासांठी व संचालक पदासाठी ३३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. परंतू यातील सर्व उमेदवार एकत्रित येऊन संस्थेचे गेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळापासून हि संस्था माजी महापौर मनोहर सपाटे हे एकहाती एकसंघ खंबीरपणे व जिद्दीने चालवित आहेत. चालू पंचवार्षिक निवडणूक २ एप्रिल २०२० रोजी गुप्त मतदानाची प्रक्रीया होऊ नये म्हणून संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व उमेदवारांचे शिष्टमंडळ अध्यक्ष मनोहर सपाटे यांना भेटून मनोहर सपाटे यांच्या नेतृत्त्वाखाली हि निवडणूक बिनविरोध होण्याच्यादृष्टीने सर्व अधिकार दिले. निवडणूका झाल्या तर समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. प्रत्येकाच्या मनामध्ये विप्तुष्टपणा निर्माण होतो व निवडणूकीमध्ये विनाकारण अपप्रचार होऊन समाजाची व संस्थेची बदनामी होते. म्हणून आपण हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत.
हि निवडणूक बिनविरोध झाल्याने शहरात व जिल्ह्यात या संस्थेची प्रतिष्ठा वाढणार आहे व एक वेगळा आदर्श निर्माण होईल. गेल्या अनेक वर्षापासून विविध पदांवरती व संचालक बोर्डावरती विद्यमान संचालक कार्यरत आहेत. परंतू बरेच संचालक प्रत्यक्ष कामकाजामध्ये कमी-जास्त प्रमाणात भाग घेतात. संस्थेचा वाढत असलेला विस्तार पाहता तरूण, नवीन व समाजकार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना मनोहर सपाटे हे काम करण्याची संधी देतील, जे अकार्यक्षम व मागील काळामध्ये काम करण्याचे प्रमाण कमी आहे अशा पदाधिकारी व संचालकांना ते निरोपाचा नारळ देतील असे वाटते. आपली संचालक बोर्डावरती निवड व्हावी म्हणून अनेकजण आपल्या गॉडफादर मार्फत मनोहर सपाटे यांच्यावरती दबाव आणून आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या संचालक बोर्डामध्ये कोणाची वर्णी लागणार व कोण घरी बसणार याकडे सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम समाजबांधवांचे व राजकिय- सामाजिक क्षेत्रातील लोकांचे व प्रतिष्ठित व्यक्तींचे या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. यावेळेस सर्वश्री महेश माने, विनायक पाटील, नामदेव थोरात, दादासाहेब देशमुख, राजेंद्र अवताडे, सुरेश जाधव, प्रभाकर खंडाळकर, चेतन साळुके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment