लोकमंगल फाऊंडेशन ने जपले सामाजिक भान ; विडी कामगार, यंत्रमागधारकांसह गरजूंना करणार अन्नदान
सोलापूर : आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल फौंडेशनच्यावतीने विडी कामगार, यंत्रमागधारकांसह बेघर आणि गरीब लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. याची सुरूवात शनिवारपासून लोकमंगल जिवक हॉस्पिटल (निलमनगर) येथे करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे हजार लोकांना अन्नदान करण्यात आले. शहरातील पूर्व विभागामध्ये बहुतांश लोक हे विडी कामगार आणि यंत्रमागधारक आहेत. सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू असल्यामुळे कामानिमित्त त्यांना घराबाहेर पडता येत नाही. हाताला काम नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे लोकमंगल फौंडेशनच्यावतीने हा उपक्रमसुरू करण्यात आला आहे.
निलमनगर येथील लोकमंगल जिवक हॉस्पिटल येथे रोज ११ ते २ या वेळेत अन्नदान करण्यात येणार आहे. संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रमसुरू राहणार असून जितके लोक येतील त्या संगळ्यांना जेवण देण्यात येणार असल्याचे फौंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. शनिवारी याचा शुभारंभ करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पहिल्या दिवशी सुमारे हजार लोकांना जेवण देण्यात आले. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरूड, संदीप पिसके, नितीन जाधव, विजू पारे, गोपी कोंगारी, मनोहर मेरगू,गंगारामपातूर, लक्ष्मण येलदंडी, अशोक बोन्याल यांच्यासह हॉस्पिटचे कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment